ठाणे:- डोंबिवली पश्चिमेत वाटवेवाडी परिसरात चोरांनी उच्छाद मांडला होता. त्यानंतर या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमुळे तीन सराईत चोरांना पकडण्यात आले. कैलास जोशी, राजेश जयस्वाल आणि संजय भोसले अशी त्यांची नावे आहेत. आरोपींकडून एलईडी टीव्ही, डीव्हीडी, ३५ ग्रॅम सोने आणि ३ दुचाक्या जप्त केल्या आहेत.
१७ जून रोजी या भागातील सुखासन सोसायटीमधील पूतरन यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. चोरांनी त्यांच्या घरातील एलईडी टीव्ही, डीव्हीडीसह ४० हजारांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास केल्या होत्या. इतक्या मोठ्या वस्तू बिनदिक्कतपणे हे चोर भरवस्तीत असलेल्या या भागातून घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते.
त्याच रात्री शेजारच्या इमारतीमध्ये सुद्धा चोरी झाली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याच्यावर नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज असून सुद्धा तपासाबाबत योग्य हालचाल केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवत तपास सुरू केला.
दरम्यान ३ चोरांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे गजाआड केले. तिन्ही आरोपी डोंबिवलीचे असून ते शेलारनाका येथे राहतात. कैलास जोशी, राजेश जयस्वाल आणि संजय भोसले अशी त्यांची नावे आहेत. आरोपींकडून एलईडी टीव्ही, डीव्हीडी, ३५ ग्रॅम सोने आणि ३ दुचाक्या जप्त केल्या आहेत. या चोरांकडून चोरी-घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिस त्यांची कस्सून चौकशी करीत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील चोऱ्या-घरफोड्यांच्या घटना कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.