अनंतकुमार गवई
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग 85 व 86 आयोजित आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेला विठ्ठल दर्शन सोहळा उत्साहात पार पडला. तीन हजाराहून अधिक भाविकांनी या दर्शन सोहळ्यात सहभागी होत भजनाचा आनंद लुटला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, प्रभाग 85च्या नगरसेविका सुजाताताई पाटील व प्रभाग 86 च्या नगरसेविका जयश्री ठाकूर आदींच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता मूर्ती पुजन व अभिषेक झाल्यावर रात्री 10 वाजेपर्यत हा दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम चालला. तीन हजाराहून अधिक भाविकांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला. विद्यार्थी व युवक कल्याण समितीचे सभापती व नेरूळ गावातील युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे, प्रभाग 96च्या नगरसेविका रूपाली भगत यांनीही विठ्ठल दर्शन घेतले.
यावेळी कंत दर्शन दरबारमधील शिख बांधवांचे मराठी भजन व कोपरखैराणे भजनी मंडळाचे भजन झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव पवार, तुकाराम टाव्हरे, पद्माकर मेहेर, यशवंत तांडेल, विरेंद्र लगाडे, मनोज मेहेर, ज्ञानेश्वर विश्वासराव यांच्यासह महिला पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.