या संदर्भात हायकोर्टात जयदेव यांची उलटतपासणी सध्या सुरू आहे त्यादरम्यान जयदेव ठाकरे यांनी हा जबाब उच्च न्यायालयात दिला आहे. ही माहिती आपल्याला खुद्द बाळासाहेबांनीच दिली होती. पण यावरुन उद्धव आणि माझ्यात वाद निर्माण होऊ नयेत, म्हणून मी याबद्दल उद्धवशी कोणतीही चर्चा करु नये असेही मला बाळासाहेबांनी सांगितले होते, असेही जयदेव यांनी सांगितले आहे.
उद्धवने आपल्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या पण त्यात काय लिहिले आहे, ते मात्र सांगितले नाही, असे बाळासाहेबांनी आपल्याला सांगितल्याचा जबाब जयदेव यांनी दिला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून मी केलेल्या फोन कॉल्स आणि एसएमएसला उद्धवनी कोणतेही उत्तर दिलेले नाही असेही जयदेव यांनी न्याायालयाला सांगितले. आपण सध्या राहत असलेला फ्लॅट हा आपण आपल्या पैशातूनच खरेदी केलाय अशी माहितीही जयदेव यांनी न्याायालयाला दिली आहे.