नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना फटकारले आहे. खंत व्यक्त करा अथवा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा असं स्पष्ट शब्दात न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी 27 जुलैपर्यंत मुदत दिली आहे.
मार्च 2014मध्ये ठाणे येथे झालेल्या रॅलीत महात्मा गांधींच्या हत्येला आरएसएस जबाबदार असल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. यानंतर राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करावा यासाठी राहुल गांधींनी मे 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.