अनेकदा दुचाकी अपघातात हेलमेंट नसल्या कारणाने दुचाकी चालकाचा मृत्यू होतो. अशा वेळी जिवीत हानी होऊ नये म्हणून पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून हेलमेंटचा वापर न करणाऱ्याला १०० रूपये दंडाची सक्ती करण्यात आली होती. परंतु या कारवाईनंतरही मोटारसायकल चालकांचा पोलिसांच्या या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे आता मात्र येत्या १ ऑगस्टपासून हेलमेंट असेल तरच पेट्रोल मिळणार आहे, प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहतूक पोलीस तैनात असतील. जर कोणी विना हेलमेंट पेट्रोल पंपावर आला तर त्याला पेट्रोल मिळणार नाही. पेट्रोल पंप चालकांना हेलमेंट शिवाय पेट्रोल देऊ नका, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या सक्तीविरोधात पेट्रोल पंप चालक व डीलर असोसिएशनकडून विरोध करण्यात येत आहे.