नवी मुंबई : साईगणेश एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्ट तसेच लिटील चॅम्प प्रिस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ सेक्टर 8 परिसरातील छत्रपती शाहू महाराज उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.
नर्सरीच्या मुलांची यावेळी सेक्टर आठमधील एल मार्केट ते उद्यानापर्यत दिंडी काढण्यात आली. या दिंडीत मुले, मुलांचे पालक, स्थानिक रहीवाशांनी सहभागी होत जनजागृतीतपर पेड लगाव – पेड बचाव, सेव्ह ट्री – दे विल सेव्ह यू, जब पेड कटता है – तो जीवन घटता है, पेड पौधे मत करो नष्ट – साँस लेने मे होगा कष्ट, ग्रो मोअर ट्रीज अशा घोषणा दिल्या.
या दिंडीत स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, साईगणेश एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक रतन मांडवे, खजिनदार विलास चव्हाण, समाजसेविका वैदेही चव्हाण यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील घटकही तसेच तनिष्का ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उद्यानात शाळेतील लहान मुलांनी उद्यानात मोठ्या संख्येने वृक्षारोपण केले. यावेळी मुलांच्या व पालकांच्या चेहर्यावरून उत्साह ओंसडून वाहत होता. लहान मुलांसह पालक व स्थानिक रहीवाशांनीदेखील वृक्षारोपण केले.