टीकाकारांना आयूक्तांचे कामातून प्रत्युतर
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेचे आयूक्त तुकाराम मुंढे यांनी तीन महिन्यात आपण केलेल्या महापालिकेच्या विकासाचा लेखाजोखा मांडून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.आयूक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर लोकप्रतिनिधी,यूनियन लिडर व
प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार टीका सुरु होती.त्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी काल आयूक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या प्रत्रकार परिषदेत
महापालिकेचा प्रगतीचा पाढा वाचला.आयूक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले, मी नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त पदाची सूत्रे २ मे २०१६ हाती घेतल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत उल्लेखनिय वाढ झाल्याचे सांगितले.या वर्षी १५ जुलै २०१५ पर्यंत १२६ कोटी रुपयांची मालमत्ता कराची वसूली करण्यात आली होती.ती आता ६२ कोटी रुपयांची वाढ होत १८८ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली.याबरोबरच महापालिकेचे मालमत्ता कर थकवणा-या ५६७२ कर धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.त्यांच्याकडून ९४६ कोटी रुपयांची महापालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे.आयूक्तांच्या धडक कामगिरीने महापालिकेच्या उपकरातही लक्षणिय वाढ झाली आहे.१५ जुलै २०१५ पर्यंत महापालिकेने १५७ कोटी रुपये कर गोळा केला होता.पण आयूक्तांनी केलेल्या कारवाईनंतर ३१४ कोटी रुपये उपकर वसूल करण्यात आला आहे.तर थकवण्यात आलेले १८० कोटी रुपयांच्या कर वसुलीसाठी ९४५ बँक खाती गोठवण्यात आल्याची माहीती आयूक्तांनी दिली.
महापालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी महापालिकेने ई-गव्हर्नन्सवर जास्त भर देण्यात येणार आहे.यासाठी महापालिकेने के.पी.एम.जी नावाच्या सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे.यांच्या मााध्यामातून शहराचा ३डी सर्वेक्षण केला जाणार आहे.यात शहरातील रस्ते,स्ट्रीट लॅम्प,फुटपाथ,गटारे,नाले,ईमारती
[चौकट]
> महापालिकेतील प्रशासनात सुसुत्रता निर्माण व्हावी यासाठी अधिकारी व कर्मचा-यांना शिस्त लावणे गरजेचे आहे.त्यासाठी दरारा असू नये,मात्र आदरयूकत्त भिती असायलाच पाहीजे.या मतावर आपण आजही ठाम असल्याचे आयूक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. पुढे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपण पुढे काय करणार या बाबत माहिती दिली या मध्ये ३५० कोटी रुपयांच्या खर्चाने अमृत योजनेतून सांडपाण्याचा पुर्नवापर प्रक्रीया केंद्र निर्माण करणार तुर्भेतील डम्पिंग ग्राऊंडसाठी प्रस्तावित भूखंड लवकरच महापालिकेला हस्त्तांतर होणार. शहरातील महत्वाच्या ठिकाणी पार्कींग भूखंड तयार करणार.तसेच शहरातील ट्रॅफीकचा मुद्दा निकालीत काढण्यासाठी पार्कींगचा गैरवापर करणा-या वाणिज्य ईमारतींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले