आ.मंदाताई म्हात्रे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेमध्ये शिपाईपासून सहाय्यक आयुक्त पदापर्यंत जवळपास साडेचार हजार पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे सदरची नोकर भरती करताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, नवी मुंबई महारपलिकेमध्ये अग्निशमन, आरोग्य आणि इतर विभागांमध्ये साडेचार हजार कर्मचार्यांची भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. याविषयीच्या ३२७९ पदांच्या आकृतीबंदास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेमार्फत भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
नवी मुंबई शहर येथील शेतकर्यांच्या जमिनीवर वसले असून प्रकल्पग्रस्तांची सर्व जमीन शासनाने घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे रोजगाराचे साधन बंद झाले आहे. महापलिका क्षेत्रामधील प्रत्येक गावामध्ये सुशिक्षित तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये नोकर भरती करताना प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आ. मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच महापालिकेमध्ये अनेक कर्मचारी ८ ते १० वर्षापासून तात्पुरत्या स्वरुपात काम करीत आहेत. या कर्मचार्यांनाही कायम नोकरीत सहभागी करुन घेण्याची मागणीही आमदार म्हात्रे यांनी यावेळी केली.