- मुंबई – इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र न भरलेल्यांना सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र 5 ऑगस्टपर्यंत मुदतीत वाढ केल्यानं इन्कम टॅक्स रिटर्न आता भरता येणार आहे.
बँकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे अनेकांना इन्कम टॅक्स रिटर्न 31 जुलैपर्यंत भरणं शक्य झालं नव्हतं. मात्र आता ही मुदतवाढ वाढवून देऊन 5 ऑगस्टपर्यंत केल्यानं अनेकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेला हिंसाचार हे एक कारणही इन्कम टॅक्स रिटर्नची तारीख वाढवण्यास कारणीभूत असल्याचं माहिती मिळते आहे.