नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार दिघा विभागामार्फत दिनांक 06/08/2016 रोजी सकाळी 5.00 ते 8.00 वाजता दिघा विभाग कार्यक्षेत्रातील नामदेव नगर व संजय गांधी नगर येथे उघडयावर शौचास जाणाऱ्या 8 व्यक्तींवर प्रत्येकी रु.1200/- अशी रु.9,600/- इतकी दंडत्मक रक्कम वसुल करण्यात आली तसेच सदर कारवाईच्या वेळी उपस्थित नागरिकांना उघड्यावर शौचास न जाण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. या वेळी दिघा विभागातील स्वच्छता अधिकारी श्री.सुधाकर वडजे, स्वच्छता निरिक्षक श्री राजु बोरकर, उप स्वच्छता निरिक्षक श्री.तेजस ताटे, उपद्रव पथकाचे श्री.वाघुळदे व स्वच्छाग्रही उपस्थित होते.