राजू हा दुचाकीवरून घरी जात असताना कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक साईनाथ गोपाळ साळुंखे व अन्य कर्मचार्यांनी पिंपळासफाटा येथे वाहन तपासणीसाठी नाकाबंदी लावली होती. त्या वेळी राजू दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्याच्याकडे कागदपत्रे मागितली.
या गोष्टीचा राग आल्याने राजूने नाकाबंदीच्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी वाद घालून त्यांना दमदाटी केली. त्यासह पोलिसांवर हफ्ता वसुलीचा आरोपही केला. त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणाला अटक केले आहे.