** आमदार मंदाताई म्हात्रे व भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरतांचे मार्गदर्शन
भाजयुमोचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळेंचे नियोजन
** दिघा तलावाजवळ रॅलीचा समारोप
** विद्या लोखंडे -गवई ***
नवी मुंबई : ९ ऑगस्ट या क्रांतीदिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणार्या क्रांतीकारकांना अभिवादन करण्यासाठी तसेच चले जाव चळवळ-२ स्वराज्य ते सुराज्य अशी संकल्पना मांडण्यासाठी मशाल रॅलीचे वाशीत आयोजन करण्यात आले होते.
मशाल रॅली वाशी, सेक्टर-१५ येथील भाजपा जिल्हा कार्यालय येथून सुरु होऊन तिचा समारोप दिघा तलाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ करण्यात आला. आमदार मंदाताई म्हात्रे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या सदर मशाल रॅलीत जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील, हरिष पांडे, संदीप कारंडे, गुलाब नाविक, रामदीप हलवाई, संकेत पाटील, राज जयस्वाल, अमित ढोमसे, विकास सिंह, संतोष पळसकर, आदिनाथ सारुख, जिल्हा सचिव गणेश पालवे, विवेक पाटील, प्रसाद ठाकूर, भागवत खेडकर, आदि पदाधिकार्यांसह युवा मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ९ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटीश सरकारला चले जाव चा नारा दिला होता. यानंतर अनेक क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिक
यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ब्रिटीश सरकारला हद्दपार केले. त्याच राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीकार, स्वातंत्र्यसैनिक यांची प्रेरणा घेऊन चले जाव चळवळ-२ मध्ये निरक्षरता चले जाव, शेतकरी आत्महत्या चले जाव, पाण्याचा अपव्यय चले जाव, व्यसनाधिनता चले जाव, भ्रष्टाचार चले जाव असे संदेश सदर मशाल रॅलीद्वारे देण्यात आला.