विद्या लोखंडे-गवई
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व निवासी वेलफेअर असोसिएशन (RWAs) व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कच-याच्या वर्गिकरणाबाबत विभाग स्तरावर विशेष मागदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 08/08/2016 रोजी बेलापुर विभागांतर्गत येणा-या सेक्टर-23 दारावे येथील सर्व रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण तसेच सोसायटीमध्ये कच-यांचे सेंद्रिय पध्दतीने कंपोस्ट खत तयार करण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी उप आयुक्त परिमंडळ-1 श्री.दादासाहेब चाबुकस्वार, बेलापूर विभागातील स्वच्छता निरीक्षक श्रीम.कविता खरात, उप स्वच्छता श्री. रविंद्र चव्हाण व श्री. मिलिंद तांडेल, कर्मचारी व स्वच्छाग्रही तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार दिनांक 09/08/2016 रोजी सकाळी 5.00 ते 8.00 वाजेपर्यंत घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील नौसिल नाका येथे उघडयावर शौचास जाणाऱ्या 5 व्यक्तींवर प्रत्येकी रु.1,200/- अशी रु.6,000/- इतकी दंडत्मक रक्कम वसुल करण्यात आली. सदर कारवाईच्या वेळी उपस्थित नागरिकांना उघड्यावर शौचास न जाण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी घणसोली विभागातील स्वच्छता अधिकारी श्री. शेळके, स्वच्छता निरिक्षक श्री. जाधव, उप स्वच्छता निरिक्षक श्री. वाळवी, उप स्वच्छता निरिक्षक श्री. किनी, उपद्रव पथक व स्वच्छाग्रही उपस्थित होते.