श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार १ ऑगस्ट २०१६ ते १५ ऑगस्ट या पंधरवडा कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील युवा स्वयसेवकांच्या माध्यमातुन विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नेरुळ विभाग कार्यक्षेत्रातील उप आयुक्त तुषार पवार (घ.क. व्य.) व उप आयुक्त (परिमंडळ-१) दादासाहेब चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय.ई.एस महाविद्यालयाच्या एनएसएस युनिट मधील विद्यार्थ्यांनी १२ ऑगस्ट रोजी सारसोळे डेपो व परिसरात ओला कचरा-सुका कचरा वर्गिकरण तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे बाबत मार्गदर्शन केले आणि परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी सदर विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये विभाग अधिकारी, नेरूळ उत्तम खरात, उप स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे, स्वच्छता निरीक्षक यश पाटील, अरूण पाटील, जयेश पाटील, उप स्वच्छता निरीक्षक योगेश पाटील, स्वच्छाग्रही व नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१६ या पंधरवडा कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील युवा स्वयसेवकांच्या माध्यमातुन विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन १२ ऑगस्ट २०१६ रोजी उप आयुक्त तुषार पवार (घ.क. व्य.) व उप आयुक्त (परिमंडळ-१) दादासाहेब चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विभागकार्यक्षेत्रातील पीपल ऐज्युकेशन सोसायटी या महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टी भागामध्ये परिसरात ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरण तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे बाबत मार्गदर्शन केले आणि परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी मा.उप आयुक्त (परिमंडळ-१) दादासाहेब चाबुकस्वार, बेलापूर विभागातील स्वच्छता निरीक्षक श्रीम. कविता खरात, उप स्वच्छता रविंद्र चव्हाण व मिलिंद तांडेल, शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी व स्वच्छाग्रही तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार १२ ऑगस्ट २०१६ रोजी उप आयुक्त तुषार पवार (घ.क. व्य.) व उप आयुक्त (परिमंडळ २) अंबरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभागामार्फत अडवली-भुतवली, श्रमिक नगर, हनुमान नगर येथे उघडयावर शौचास जाणार्या व्यक्तींवर व सार्वजनिक ठिकाणी उघडयावर कचरा टाकणार्या नागरिकांवर रु.५,८५०/- इतकी दंडत्मक कारवाई करण्यात आली. सदर मोहिमेच्या वेळी कोपरखैरणे विभागातील, स्वच्छता निरिक्षक सुधीर पोटफोडे, दिनेश वाघुळदे, स्वच्छता निरीक्षक थोरात, नाईक, बेंडाळे, साळसकर व स्वच्छाग्रही उपस्थित होते.