श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ९८ व १०९च्या वतीने आयुर्वेदीक आरोग्य शिबीर आणि आयुर्वेदीक तज्ज्ञांचा मोफत सल्ला व मार्गदर्शन अशा कार्यक्रमांचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नेरूळ सेक्टर २८ मधील श्री गणेश सोसायटीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संधीवात, मधुमेह, लठ्ठपणा, हद्यरोग, महिलांचे मासिक पाळीचे आजार यासह अन्य विविध आजारांवर आयुर्वेदीक तज्ज्ञांमार्फत मोफत मार्गदर्शन व आरोग्यविषयक सल्ला देण्यात येणार आहे.
या शिबिरात सहभागी होवून आपल्या आजारविषयक समस्यांचे निवारण करून घ्यावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक माजी उपमहापौर व नगरसेवक अशोकशेठ गावडे व नगरसेविका ऍड. सपना गावडे-गायकवाड यांनी केले आहे.