- ग्रोस इसलेट : वेगवान गोलदांजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे तिसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी यजमान वेस्ट विंडीजला १०८ धावांत गुंडाळून भारताने २३७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारताने दुसरा डाव ७ बाद २१७ धावांवर घोषित करून विंडीजसमोर विजयासाठी ३४६ धावांचे अवघड आव्हान ठेवले. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत दुसऱ्या डावातील पहिल्या षटकापासून विंडीजवर वर्चस्व गाजवले. मोहम्मद शमीने १५ धावांत ३ महत्त्वाचे फलंदाज बाद करून विंडीजचे कंबरडे मोडले. इशांत शर्माने ३० धावांत २ बळी घेतले. यात नाबाद शतक झळकावून विंडीजला दुसरी कसोटी अनिर्णीत राखून देणाऱ्या रोस्टॉन चेसचाही समावेश आहे. रवींद्र जाडेजाने २, तर भुवनेश्वर कुमार व आश्विन यांनी प्रत्येकी १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.
विंडीजतर्फे ब्राव्होने सर्वाधिक ५९ धावांचे योगदान दिले. विंडीजतर्फे केवळ ४ फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले. पहिली कसोटी जिंकल्यानंतर दुसरी कसोटी अनिर्णीत राखून विंडीजने मालिकेत रंग भरला होता. अखेरची कसोटी पोर्ट आॅफ स्पेन येथे १८ तारखेपासून सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत :
पहिला डाव : सर्वबाद ३५३. दुसरा डाव ७ बाद २१७ (घोषित).
वेस्ट इंडिज :
पहिला डाव : सर्वबाद २२५.
– दुसरा डाव : ४७.३ षटकांत सर्वबाद १०८ (के्रग ब्रेथवेट ४, लियोन जॉन्सन ०, सॅम्युअल्स १२, ब्राव्हो ५९, रोस्टन चेस १०, ब्लॅक वूड १, डाव्रिच ५, होल्डर १, जोसेफ ०, गॅब्रियल ११, शमी ३/११, इशांत २/३०, भुवनेश्वर १/१३, रवींद्र जाडेजा २/२०).