श्रीकांत पिंगळे : ९८२१८९९९१४
नवी मुंबई : नवी मुंबई मनपा कार्यक्षेत्राचा विचार करता सध्या रवींद्र सावंत या कामगार नेत्याने कामगारांच्या समस्या सोडविण्याचा व कामगारांना सुविधा पुरविण्याचा धडाका लावला आहे. इंटकचे नवी मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना इंटकच्या कार्यकारिणीचा विस्तार करताना रवींद्र सावंत यांनी नेरूळ विभाग इंटकच्या अध्यक्षपदी गजानन मुळीक यांची नियुक्ती केली आहे.
गजानन मुळीक यांना नियुक्तीपत्र नवी मुंबई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी सभापती व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव संतोष शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी इंटक नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, ज्ञानेश्वर गावडे यांच्यासह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नेरूळ नोडमधील कंपन्या, कारखाने, दुकानांमधील असंघठीत कामगार, महापालिका तसेच खासगी आस्थापनेतील कामगार यांना इंटकच्या माध्यमातून न्याय देण्याचा मुळीक हे प्रयास करतील असा आशावाद यावेळी रवींद्र सावंत यांनी व्यक्त करताना नवी मुंबई इंटकच्या वाटचालीचा आढावा घेतला.