विश्वनाथ भोसले, राहुल चौधरी, करण चौधरी, सुधीर तळवलकर, राजेश करुणाकर अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना कल्याणच्या सुट्टीच्या कोर्टात हजर केले. या सर्वांना अधिक चौकशीसाठी दोन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास श्रीमलंग रोड येथे पोलीस नाईक सतीश देसाई गस्तीवर होते. यावेळी मलंग रोडवर असलेल्या रंगीला बारमध्ये देसाई हे तपासणी करत होते. याच दरम्यान काहीजण मद्यधुंद अवस्थेत बारच्या बाहेर निघाले. त्यानंतर देसाई यांच्या मोटरसायकलवर लघुशंका केली. देसाई यांनी त्यांना हटकून असे करू नका अशी समज दिली. त्यामुळे खवळलेल्या मद्यपींनी देसाई यांच्याशी वाद घातला. बाचाबाचीनंतर मद्यपींनी देसाई यांना शिवीगाळ करत झोडपून काढले.
या हल्ल्यात जखमी झालेल्या देसाई यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अधिक कुमक मागवून घेतली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांची धरपकड केली. जखमी देसाई यांच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या हल्लेखोरांमध्ये अटक केलेल्या पेक्षा अधिक जण असल्याचा पोलिसांचा कयास असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.