तेथे या तरूणीचे अश्लील फोटो काढण्यात आले. हे फोटो मोबाईलवर व्हाट्सअॅपद्वारे प्रसारीत करण्यात आले. या प्रकाराने तरूणी भयभीत झाली. शिवाय दुसऱ्या मुलीबरोबर लग्न होईपर्यंत माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, नाहीतर अॅसिड टाकून चेहरा विद्रूप करीन, अशी धमकी तिला देण्यात आली. भविष्यात या दोघांकडून आपल्या जीवाला धोका उद्भवण्याच्या शक्यतेने भयभीत झालेल्या पीडितेने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियाने शनिवारी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरूणीच्या जबानीवरून तिला ब्लॅकमेल करणारे पंकज सावंत आणि त्याचा मित्र अनिकेत पाटील या दोघांच्या विरोधात कलम ३५४ (अ), (१), ५०४, ५०६, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम ६७ (ब) सह पोस्का कलम ११ (२), १३ (क) अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.