-
नवी दिल्ली : अनेक महापुरूषांनी, क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे आपल्याला स्वराज्य मिळाले असून आपण आजचा स्वतांतत्र्य दिवस पाहू शकत आहोत. आपल्या या स्वराज्याचे ‘सुराज्य’ करण्याचा संकल्प आपण आजच्या दिवशी केला पाहिजे व त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपली जबाबदारी उचलली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. भारताच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधा मोदींनी लाल किल्ल्यावरून सर्व भारतीयांना देशवासियांना शुभेच्छा देत संबोधित केले. ‘ भारताचे वय ७० वर्ष नाही, आपल्याला हजारो वर्षांचा जुना समृद्ध इतिहास असून आपल्याला भीमापासून भीमराव आंबेडकरांपर्यंत अनेक महान व्यक्तींची परंपरा लाभली आहे.’ असे मोदींनी सांगितले. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे :
– हा ७० वा स्वातंत्र्यदिन नवा संकल्प घेऊन आला आहे.
– अगणित महापुरूषांनी, क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे आपण आज हा दिवस पाहू शकत आहोत.
– भारताचं वय ७० वर्ष नाही. हजारो वर्ष जुना आपला समृद्ध इतिहास असून आपल्याला भीमपासून भीमराव यांच्यापर्यंत अनेक महान व्यक्तींची परंपरा लाभली आहे.
– पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचे पंतप्रधानांनी केले स्मरण. -आपल्या स्वराज्याचा सुराज्यात परिवर्तन करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सुराज्य बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
– आपल्या देशात अनेकविध समस्या असल्या तरी आपल्याकडे सव्वाशे कोटी देशवासियांची शक्तीही आहे. प्रत्येकाने आपापला भार उचलून या समस्यांशी लढा देऊन देशाला सुराज्य बनवले पाहिजे.
– एक काळ असा होता जेव्हा सरकार अनेक आरोपांनी घेरलं गेलं होतं. मात्र आमचं सरकार अपेक्षांनी घेरलेलं आहे.
– गेल्या दोन वर्षांत अनेक चांगली काम केली. कामं करण्यासाठी नियत आणि जबाबदारीची जाणीव हवी. चांगल्या कारभारासाठी सरकारने संवेदनशील असणे गरजेचे आहे.
– आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर व्यवस्थेत अनेक सकारात्मक बदल झाले.
– गेल्या २ वर्षात सरकारनं एवढी असंख्य कामं केली आहेत, की त्याचा पाढा वाचायचा म्हटलं तर लाल किल्ल्यावरुन मला आठवडाभर बोलत बसावं लागेल.
– तंत्रज्ञानाच्या जोरावर आज एका मिनिटात 15 हजार रेल्वे तिकीट मिळणं शक्य झालं आहे. केवळ योजनांच्या घोषणांमुळे आता जनता समाधानी होत नाही .
– देशात लाखो अडचणी आहेत, पण त्यावर उपाय शोधणारी सव्वाशे कोटी जनता आहे. आज मध्यमवर्गीलाही पासपोर्ट मिळवणं सोप्प झालं आहे, आता अवघ्या आठवडाभरात पासपोर्ट मिळतो, 2015-16 या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट दिले.
– यापूर्वी दिवसाला ७० ते ७५ किमीचे रस्ते बनत होते, आमच्या सरकारच्या कार्यकाळात दिवसाला १०० किमी रस्ते बनवण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत.
– क आणि ड वर्गातील तब्बल ९ हजार सरकारी पदांसाठी मुलाखतीची पद्धत रद्द केली आहे. थेट भरतीमुळे पारदर्शकता आली आहे. 9 हजार पदांसाठी मुलाखत न घेता तरुणांसाठी नोकरीची संधी देण्यात आली.
– ६० वर्षांत केवळ १४ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली होती. मात्र आता ६ आठवड्याच ४ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली. देशातील ७० कोटी नागरिकांना आधारशी जोडले.
– कायद्याचे जंजाळ लोकांसाठी अडचणीचं ठरतं आहे, आम्ही त्यात सुसुत्रीकरण करत आहोत, कायदे कालसुसंगत बनवत आहोत.
– अतिशय कमी वेळात देशातील गावात 2 कोटीहून अधिक शौचालये बनली आहेत.
– देशातील १८ हजार गावांपैकी १० हजार गावात वीज पोहोचल्याचे सांगताना मला आज अतिशय आनंद होत आहे. आम्ही २१ कोटी लोकांना जनधन योजनेशी जोडून असंभव काम संभव करुन दाखवले.
– देशातील १८ हजार गावांपैकी १० हजार गावात वीज पोहोचल्याचे सांगताना मला आज अतिशय आनंद होत आहे. आम्ही २१ कोटी लोकांना जनधन योजनेशी जोडून असंभव काम संभव करुन दाखवले.
– प्रत्येकाने आपल्या घरात एलईडी बल्ब लावून वीजेची बचत करावी तसेच पर्यावरणाचेही रक्षण करावे. ३५० रुपयांचा एलईडी बल्ब ५० रुपयांना विकलाः १३ कोटी बल्बचे वाटप करण्यात आले.
– आधीच्या सरकारच्या काळात महागाईचा दर 10 टक्क्यांवर होता, मात्र आम्ही हा दर 6 टक्क्यांवर जाऊ दिला नाही. – आमच्या सरकारने महागाई नियंत्रित केल्याने गरिबांना दिलासा मिळाला.
– डाळीचे संकट लवकरच दूर करणार, डाळीचं उत्पादन वाढवून दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणार. शेतकऱ्याला पाणी मिळालं तर तो मातीतून सोनं उगवेल, जलसिंचन योजनेचा आवाका वाढवणार, शेतक-यांपर्यंत सिंचन योजना लवकर पोहोचवणार.
– जनतेच्या अपेक्षा स्वाभाविक आहेत, मी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
– आधीच्या सरकारने आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न केला,पण सरकारपेक्षा भारताची ओळख बनवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
– रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म हा सरकारचा मंत्र आहे.
– आधीच्या सरकारच्या उणिवा दूर करुन आम्ही पुढे जात आहोत,.
– प्रोजेक्ट मॉनिटरिंग ग्रुपच्या साहाय्याने २७० जुन्या प्रोजेक्टवर काम सुरु आहे.
– भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही आधारला सरकारी योजनाशी जोडलं.
– स्पष्ट धोरण, पारदर्शकतेमुळे आमचं सरकार बेधडक निर्णय घेत आहे.
– आम्ही तोट्यात गेलेल्या बीएसएनएलला नफ्यात आणलं, कोळश्याची समस्या सोडवली, सिंचन योजनेसाठी प्रयत्न सुरु आहेत.
– सुकन्या योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना जोडण्यात आले.
– पोस्ट ऑफिसला पेमेंट बँक बनवण्याचा प्रयत्न,पोस्ट ऑफिसला पुनरुज्जीवित करणार.
– सरकारने सुरु केलेल्या मुद्रा योजनेचा लाभ ३.५० कोटी लोकांहून अधिक लोकांनी घेतला.
– जीएसटीच्या माध्यमातून करप्रणालीत समानता आणण्याचा प्रयत्न. जीएसटीमुळे देशाची आर्थिक शक्ती वाढेल, विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षीयांचे आभार.
– जातीपातीमध्ये अडकलेल्या, विभागलेल्या समाजाचे कधीच भले होऊ शकत नाही. दलित, वंचित असो, आदिवासी, साक्षर किंवा निरक्षर, सर्वजण आमचं कुटुंब आहे. सामाजिक न्याय ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे.
– ‘विविधतेत एकता’ हीच आपल्या देशाची संस्कृती आहे. दहशतवाद वा नक्षलवादसमोर भारत कधीच झुकणार नाही .
आम्ही टाळणं नाही, टक्कर देणं जाणतो, वन रँक वन पेन्शनचं महाकाय आम्ही काम पूर्ण केलं.
– आधीच्या सरकारच्या उणिवा दूर करुन आम्ही पुढे जात आहोत.
– वाट भरकटलेल्या, हातात शस्त्रे घेतलेल्या तरूणांनी आपल्या मायदेशी, आपल्या घरी परत यावं.
– पेशावरच्या शाळेवर हल्ला झाला, शेकडो निरागस मुलांचे प्राण गेले. तेव्हा भारतातील प्रत्येक शाळेत अश्रू तरळले होते, प्रत्येक विद्यार्थी दु:खात होता.
– बलुचिस्तानमधील नागरिक जेव्हा भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानतात, तेव्हा तो सव्वाशे कोटी जनतेचा सन्मान असतो..
– दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांची गय केली जाणार नाही.