नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते,उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सन्माननीय उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी सभागृह नेता जयवंत सुतार, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, रविंद्र इथापे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, माजी नगरसेवक वैभव गायकवाड आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच “बेटी बचाओ – बेटी पढाओ” हा संदेश प्रसारीत करणारे 200 हून अधिका बाईकर्स तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांततही महापालिका पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयाला तिरंगी रंगात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई 14 ते 16 ऑगस्ट 2016 याकालावधीत केली जात असून तिरंगी रंगात झळाळणारे महापालिका मुख्यालय बघण्यासाठी अनेक नागरिक महापालिका मुख्यालय परिसराला आवर्जून भेट देत आहेत.