नवी मुंबई : महाराष्ट्र राज्यात आणि भारत देशात गेली १५ वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आघाडी सरकारशी अविरत संघर्ष करुन देश आणि राज्यात ‘भाजप’ने सत्ता स्थापन केली आहे. महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने ‘डॅशींग’ मुख्यमंत्री मिळाला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन लोकोपयोगी निर्णयांची अंमलबजावणी करीत आहेत. शासनाच्या योजना समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. त्यामुळे आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महापालिकेत ‘भाजप’चीच सत्ता येईल. २०२० मधील निवडणुकीत महापालिकेत ‘भाजप’चाच महापौर निवडून येईल, असे प्रतिपादन ‘भारतीय जनता युवा मोर्चा’चे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी केले.
नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे १३ ऑगस्ट रोजी नेरुळ सेक्टर-२४ मधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये ‘युवा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार योगेश टिळेकर बोलत होते.
युवा मोर्चा ‘भाजप’चा कणा आहे. राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने राज्याची सत्ता भाजपकडे सत्ता दिली आहे. त्यामुळे ‘भाजप युवा मोर्चा’च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या लोकोपयोगी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. ‘युवा मोर्चा’च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बुथ लेव्हलपासून लोकोपयोगी कामे केली तर महापालिकेत ‘भाजप’चा महापौर बसण्यास कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वासही यावेळी आ.योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला.
राज्यात ‘भाजप’चा मुख्यमंत्री असल्याने कोणालाही घाबरू नका, नागरीकांचे आणि युवकांचे प्रश्न सोडवा, असे आवाहनही यावेळी आ.योगेश टिळेकर यांनी ‘युवा मोर्चा’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. ‘युवा मोर्चा’च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहीन, अशी ग्वाहीही आ.योगेश टिळेकर यांनी यावेळी दिली.
स्वाभिमानामुळेच राजकीय कारकीर्दीत भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर झाला नाही. आमदारकीचा विचार करत होते, म्हणून आमदार झाले, असे मनोगत यावेळी भाजप नेत्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले.
स्वाभिमान जपा, तो नेहमी जिवंत ठेवा, ताठ मानेने जगायला शिका. तुम्हीही विचार करायला हवा. काम करत असताना कधीच लाज बाळगू नका, असा सल्ला यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘युवा मोर्चा’च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिला.
माणसे जोडायला शिका जग तुमच्याशी आपोआप जोडले जाईल, असे नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी ‘युवा मोर्चा’च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सांगितले.
या मेळाव्यास ‘भारतीय जनता युवा मोर्चा’चे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई प्रभारी ऍड. कल्याणी रहाटकर, ‘भाजप’चे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मारुती भोईर, माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे, महामंत्री एकनाथ मगडवार, कृष्णा पाटील, डॉ. राजेश पाटील, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विजय घाटे, महिला मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्षा दुर्गा ढोख, ‘भाजपा युवा मोर्चा’चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, नगरसेवक दिपक पवार, सुनील पाटील, नगरसेविका सौ. उषा पाटील, माजी नगरसेविका सौ. विजया घरत, माजी नगरसेवक संपत शेवाळे. या कार्यक्रमात ‘भाजपा युवा मोर्चा’च्या नवी मुंबई जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणी पदाधिकार्यांरी नियुक्ती करण्यात आली.
मेळावा यशस्वी करण्यासाठी ‘भाजपा युवा मोर्चा’चे महामंत्री संदिप कारंडे, गुलाब नाबीक, हरिष पांडे, जगन्नाथ कोळी, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विकास सिंग, रामदिप हलवाई, संकेत पाटील, सचिव विवेक पाटील, गणेश पालवे, मोहित बिलापट्टे यांनी मेहनत घेतली.
मेळाव्याचे सुत्रसंचालन ‘भाजपा युवा मोर्चा’चे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अमर पाटील यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी’च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी कु. हरीश हलवाई यांची नियुक्ती करण्यात आली.