मुंबई : महाडमधील ब्रिटिशकालीन पूल कोसळून २८ प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याचे प्रकरण ताजे असतानाच रविवारी मुंबई आणि नवी मुंबईस जोडणार्या वाशी खाडीवरील जुन्या पुलास तडे गेल्याचे उघड झाले. त्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने पुलाची पाहणी केली. अवजड वाहन गेल्याने पुलावरील रस्त्यास मोठी भेग पडली आहे. मात्र, पुलास तडा गेला नाही. तरीदेखील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यानंतर लगेच पूल नादुरुस्त झाल्याबद्दल आश्चयर्र् व्यक्त करण्यात येत आहे.