नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार उप आयुक्त तुषार पवार (घ.क. व्य.), मा. उप आयुक्त (परिमंडळ-2) अंबरीश पटनिगीरे व सहा. आयुक्त अशोक मढवी कोपरखैरणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एफ. नाईक कॉलेजच्या एन.एस.एस.(NSS)विद्यार्थ्यां यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छते बाबतच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरात NSS चे विद्यार्थ्यी व साफसफाई कामगारांमार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
सदर मोहिमेमध्ये नगरसेविका लता मढवी यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी आर. एफ. नाईक कॉलेजचे चेअरमन सुरेश नाईक, स्वच्छता निरिक्षक सुधीर पोटफोडे, दिनेश वाघुळदे, स्वच्छता निरीक्षक थोरात, नाईक, बेंडाळे, साळसकर, कॉलेजचे प्राचार्य प्रताप महाडीक, थळे, म्हात्रे, कर्मचारी वर्ग तसेच स्वच्छाग्रही तसेच परिसरातील नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.