याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही ग्राहकांना तूरडाळीच्या पाकिटांची विक्री राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात १०३ रुपये आणि ९५ रुपये प्रती किलो असे डाळीचे दर हे संपूर्ण देशात कमी आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचा विचार करून डाळीच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. साठेबाजांवर देखील आम्ही कडक कारवाई करीत असून, ९५ रुपये प्रतिकिलो डाळ ही रिलायन्स फ्रेश, बिग बाजार, हायपर सिटी, ग्रोमा, आदी ठाणे जिल्ह्यातील ३३ मोठ्या मॉल्समधून विक्री करण्यात येत आहे.
शिधापत्रिकाधारकांना १०३ रुपये प्रती किलो डाळ विकण्याचा निर्णय घेतला. ती पूर्वी खरेदी केलेली डाळ होती.
आता नुकताच केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी तूरडाळीचा बफर स्टॉक उपलब्ध करून दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासाठी सुमारे ४५ हजार मेट्रिक टन तूर उपलब्ध झाली आहे. या तुरीची भरड करून त्याची ही डाळ महाराष्ट्र शासन असे पाकिटावर नमूद करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तिचा भाव प्रतिकिलो ९५ रुपये इतका असल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगीतले. कालपर्यंत ठाणे जिल्ह्यातील विक्री केंद्रांवर १६९.८३ क्विंटल डाळ उपलब्ध झाली. त्यापैकी ३२.१८ क्विंटल डाळ विक्री झाली असून, या विक्री केंद्रांवरून मोठ्या प्रमाणावर डाळ विक्री होईल, असा विश्वास उप नियंत्रक शिधावाटप संगीता टकले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी प्रधान कार्यालयातील उप नियंत्रक शिधावाटप प्रकाश जोशी, तहसीलदार किरण सुरवसे, आदि अधिकारी उपस्थित होते.