जून महिन्यात हे सर्व जण भारत सोडून गेले आहेत. आपण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलो असून पुन्हा परतणार नसल्याचे अश्फाकने त्याच्या लहान भावाला पाठवलेल्यासंदेशात म्हटले आहे. अश्फाकचे वडील अब्दुल माजीद यांनी सहा ऑगस्ट रोजी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यात हनीफ, केरळचा एका शिक्षक अब्दूर रशीद, नवी मुंबईत राहणारा अरशी कुरेशी आणि कल्याणचा रिझवान खान यांचा उल्लेख आहे. या सर्वांनी अश्फाकला इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अब्दूर रशीदही सिरियात गेला आहे. अश्फाकला एक बहीण व भाऊ आहे. त्याने २०१४ पासून गाणे ऐकणे, टीव्ही पाहणे बंद केले. एकाच कुटुंबातील एवढे लोक दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.