नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार 22/08/2016 रोजी तुषार पवार, उप आयुक्त (घ.क. व्य.) व अंबरीश पटनिगीरे उप आयुक्त (परिमंडळ 2) यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 5 ते 8 दरम्यान दिघा विभागातील रामनगर, ईश्वरनगर, इलठणपाडा सुभाष नगर, कन्हैया नगर व साठेनगर येथे उघडयावर शौचास जाणाऱ्या 6 व्यक्तींकडुन प्रत्येकी रु.1200/-याप्रमाणे रु.7,200/- इतकी दंडत्मक रक्कम वसुल करण्यात आली. सदर कारवाईच्या वेळी उपस्थित समस्त नागरिकांना मेगाफोनद्वारे उघड्यावर शौचास न जाण्याबाबत प्रबोधन कऱण्यात आले होते. या वेळी दिघा विभागाचे सहा. आयुक्त प्रकाश वाघमारे, स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे, स्वच्छता निरिक्षक राजु बोरकर, उप स्वच्छता निरिक्षक तेजस ताटे, उपद्रव पथकाचे वाघुळदे व संबंधित स्वच्छाग्रही उपस्थित होते.