सोमवारी रात्रीच्या सुमारास गोवेली ठाकूर पाडा येथील चंद्रकांत हिंदोळे (२४ ), बनन हिंदोळे (५०) व शेवंती हिंदोळे (४५ )हे मुलगा व आई- वडील वाहोली येथील भोक्सीच्या नाल्यात मासे, खेकडे पकडण्यासाठी गेले होते. याच वेळी येथे तुटून पडलेली विज वितरण कंपनीची विद्युत वाहक तार तुटून पडली होती. सदर तारेचा झटका लागून यात चंद्रकांत जागीच मृत पावला तर आई-वडील गंभीर जखमी झाले. जखमींवर जेजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडण्यापूर्वी संबधीत विद्युत तार तुटल्याची खबर वाहोली ग्रामस्थांनी संबधीत गोवेली येथील अभियंता अनिल परसुरकर यांना फोनवरून व प्रत्यक्षदर्शीने दिली होती. कर्मचारी कमी असल्याचे उत्तर देत सदर विद्युत वाहक तार तशीच ठेल्यामुळे ही घटना घडली.
या घटनेनंतर परिसरातील आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. वितरण कंपनी लोकांना जिवनदान देण्यासाठी विज देते की, त्यांचे जिव घेण्यासाठी. या सारख्या तिन ते चार घटना ग्रामीण भागात आतापर्यंत काही काळात घडल्या आहेत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पोलीस ठाण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. संबधीत दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला नाही. तर लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करित अशा ही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याची दखल घेऊन टिटवाळा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भूषण चव्हाण यांनी तपास करून वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यात हालगर्जी व निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने वीज अभियंता अनिल परसुरकर यांच्यावर मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी कारवाई करण्यात कुठल्याही चालढकल होणार नाही. संबधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, व्यंकट आंधळे यांनी सांगितले.