समाजसेवक महादेव पवारांच्या परिश्रमाने होणार हे शक्य
नवी मुंबई : वाढत्या महागाईमुळे भाज्या आहारात कमी होत असतानाच नेरूळवासियांना आता ताजी व स्वस्त भाजी दररोज उपलब्ध होणार आहे. सकाळी ८ ते रात्री १० वेळेमध्ये नेरूळ सेक्टर ६ परिसरात होलसेल भाजी विक्री केंद्राच्या माध्यमातून ही भाजी थेट ग्राहकांना मिळणार आहे.
गेली पावणे दोन वर्ष समाजसेवक महादेव पवार यांच्या माध्यमातून दर सोमवारी ताजी व स्वस्त भाजी ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात आहे. दत्तकृप्पा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भाजी ग्रामीण भागातून खरेदी करून ती ना नफा ना तोटा या तत्वावर फक्त आठवड्यातून एकदाच भाजी विक्री होत असे. परंतु ग्राहकांची वाढती मागणी पाहून दररोज ग्राहकांना ताजी व स्वस्त दरात भाजी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महादेव पवार व त्यांच्या सहकार्यांनी घेतला.
सोमवार, दि. २२ ऑगस्टपासून सकाळी ८ ते रात्री १० या वेळेमध्ये ग्राहकांना ताजी व स्वस्त भाजी उपलब्ध होणार असून थेट शेतातील भाजी ग्राहकांच्या घरात पोहोचविणार असल्याचे महादेव पवार यांनी यावेळी सांगितले. नेरूळ सेक्टर सहामधील मारूती मंदीरासमोरील प्लॉट ३१९-३२० वरील शॉप क्रं. ४ या ठिकाणी ही ताजी व स्वस्त भाजी होलसेल भाजी विक्री केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन महादेव पवार यांनी केले आहे.