श्रीकांत पिंगळे
* सर्जिकल स्ट्राईक कोणत्या राजकीय पक्षाने नाही तर देशाच्या जवानांनी केले आहे
नवी मुंबई : ‘मेक इन इंडिया’मुळे देशातील ६०० करोडवर असणारी निर्यात आणि ३००० करोडोंवर गेली आहे. मागील वर्षी संरक्षण क्षेत्रातील निर्यातीमध्ये मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच युद्ध क्षेत्रात देखील प्रगती झाली असून, २०१३ नंतर मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०१३ मध्ये शस्त्रसाठ्यात मोठी कमतरता होती, त्यात चांगली वाढ झाली असल्याचे देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर येथे आयोजित इंजिनिअरांग टेक्नॉलॉजी अँड हिट ट्रीटमेंट या विषयावरील तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी जेएसडब्ल्यु समुहाचे सज्जन जिंदाल, अध्यक्ष प्रदीप गोयल, पद्मविभूषण डॉ. माशेलकर आदि मान्यवर उपस्थित होते.
सध्या भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यातून नवनवीन शोध पुढे येत आहेत. या सर्वांचा कल ‘मेक इन इंडिया’कडे झुकणारा आहे. छोट्या गोष्टींमधून मोठे ध्येय गाठण्याची ती सुरुवात असल्याचे ना. परीर्र्कर यांनी यावेळी सांगितले.
तंत्रज्ञानशी संबंधित ध्येय धोरणाचा अंतिम मसुदा बनविण्याचे काम सुरु असून, ते अंतिम टप्प्यात आहे. यामुळे मटेरियल इंडस्ट्रीला चालना मिळेल; परंतु त्यात सुरुवातीला थोडे जास्त पैसे द्यावे लागतील. देशाला शस्त्रसज्ज बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जहाजाला लागणारे स्टील मटेरियल भारतात दोन कंपन्या बनवत असून, ४५ टक्के पार्ट बाहेरून विकत घ्यावे लागत असल्याचे मनोहर पर्रीकर म्हणाले.
सर्जिकल स्ट्राईक कुठल्या राजकीय पक्षाने नाही, तर देशाच्या जवानांनी केलेले आहे. त्यामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’वर टिका करणार्यांनी आधी स्वतः सर्जिकल व्हावे असे सांगत ‘सर्जिकल स्ट्राईक’बाबतची कोणतीही माहिती सरकारने उघड केलेली नाही. आर्मीने जे केले, त्याबाबतची माहिती त्यांनी जाहिर करावी, असे निर्देश सरकारच्या वतीने आर्मीला देण्यात आले आहेत, अशी माहिती देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाशीत दिली.
भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यावर बोलताना सर्जिकल स्ट्राईक भारतीय सैनिकांनी केलेले आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण श्रेय भारतीय सैनिकांना आणि देशातील १२७ कोटी जनतेचे असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शेवटी स्पष्ट केले.
यावेळी बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, भाजयुमाचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, ठाणे जिल्हाध्यक्ष मारूती भोईर, माजी जिल्हाध्यक्ष भगवानराव ढाकणे, गोपाळराव गायकवाड, बिक्रम पराजुली, कृष्णा पाटील, माजी महापौर सुषमा दंडे, महिला मोर्चाच्या महामंत्री सौ. मंगल घरत, मुक्ता बोहरा यांनी संरक्षणमंत्री पर्रिकर यांचे स्वागत केले.