नवी मुंबई : अनेक उत्सवांप्रमाणे श्री दुर्गामातेचा नवरात्रोत्सवही नवी मुंबईत अत्यंत उत्साहाने साजरा होतो. नऊ दिवस श्रध्देने प्रतिष्ठापना करून पुजिल्या जाणा-या श्री दुर्गामातेस भावपूर्ण निरोप देत आज मूर्ती विसर्जन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 23 विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे संपूर्ण विसर्जनसोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला. महापालिका क्षेत्रात एकुण 477 सार्वजनिक व 721 घरगुती अशा एकुण 1198 मुर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 चे उप आयुक्त अंबरीश पटनिगीरे व सर्व 8 विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी संपूर्ण विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. सर्वच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त श्री. हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 82 सार्वजनिक, नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 39 घरगुती व 53 सार्वजनिक, वाशी विभागात 3 विसर्जन स्थळांवर 121 घरगुती व 42 सार्वजनिक, तुर्भे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 33 घरगुती व 42 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 166 घरगुती व 44 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 118 घरगुती व 70 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 55 घरगुती व 34 सार्वजनिक, दिघा विभागात 1 विसर्जन स्थळांवर 189 घरगुती व 110 सार्वजनिक अशाप्रमाणे एकुण 23 विसर्जन स्थळांवर 721 घरगुती व 477 सार्वजनिक अशा 1198 मुर्तीचे विसर्जन संपन्न झाले. सर्व विसर्जनाठिकाणी महानगरपालिकेने नेमलेल्या स्वयंसेवकांसह तराफे, विद्युतव्यवस्था, जलव्यवस्था चोख होती. त्यामुळे हा विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पडला.