नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जानकरांचा जळजळीत निषेध
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे मंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात आज (शुक्रवारी) नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वाशी येथील शिवाजी चौकात जळजळीत निषेध आंदोलन करण्यात आले. जानकरांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेली आहे. त्यामुळे ते अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत, अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत असा कडक इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांनी या आंदोलनप्रसंगी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, महिला जिल्हाअध्यक्षा माधुरीताई सुतार, युवक जिल्हाअध्यक्ष सुरज पाटील, पालिकेतील सभागृह नेते जयवंत सुतार, पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष प्रतोद डॉ. जयाजी नाथ, सेवादल जिल्हाअध्यक्ष दिनेश पारख, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जब्बार खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कृतीचे माहेरघर आणि थोरामोठ्यांचा मान ठेवणार्या महाराष्ट्राची ओळख जगभरात आहे. पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालेल्या जानकरांना याचा विसर पडल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करीत असल्याची खरमरीत टिका डॉ. नाईक यांनी केली. शरदचंद्र पवार यांनी केलेला बारामतीच्या विकासाचा नावलौकिक जगभरात आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले आहे. त्या बारामतीची वाट लावून बारामती उध्वस्त करण्याची भाषा करणार्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल असंसदीय शब्द वापरणार्या जाणकरांचा निषेध करीत बारामतीची वाट लावायला जानकरांना १०० जन्म घ्यावे लागतील, असा टोलाही डॉ. नाईक यांनी लगावला.
जिल्हाअध्यक्ष अनंत सुतार म्हणाले कि, जानकरांनी शरदचंद्र पवार आणि बारामतीबद्दल जी असंसदीय भाषा वापरली त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने जानकरांना समज दिली नाही तर आम्ही नवी मुंबईतील सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकतें रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करू. आम्हाला बेताल बोलता येत नाही असे नाही परंतु आम्हाला आमच्या नेत्यांनी अशी शिकवण दिलेली नसल्याचे सांगत फुकटची आमदारकी आणि फुकटचे मंत्रिपद मिळालेल्या जानकरांचा आम्ही निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक आणि नवी मुबई राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र इथापे यांनी रासपचे नेते आणि मंत्री महादेव जानकर यांनी ज्या शब्दात राष्ट्रवादीकॉंग्रेसच्या नेत्यांवर टीका केली ती अत्यंत निंदनीय असून नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अशी असंसदीय भाषा वापरणार्या जाणकारांचा धिक्कार करत असल्याचे म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा युवकअध्यक्ष सुरज पाटील म्हणाले कि, मंत्री जानकर यांनी राष्टवादी कॉंग्रेसच्या नेत्यांबद्दल वापरलेली भाषा योग्य नसून आम्ही त्यांचा निषेध करतो. पवार साहेब जेष्ठ नेते आहेत जानकरांनी त्यांची जाहीर माफी मागावी. पवार साहेब मोठ्या मनाचे आहेत ते त्यांना माफ करतील. जर माफी मागितली नाही तर नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जेष्ठ नगरसेविका नेत्रा शिर्के म्हणाल्या कि ज्यांना लोक निवडून देतात त्यांच्याकडून त्या लोकांना खूप अपेक्षा असतात. त्यांना आपला आदर्श मानतात. त्या लोकांनी मंत्री पदाची हवा डोक्यात गेल्यावर इतर पक्षाच्या नेत्यांबद्दल अशी भाषा वापरने योग्य नसून आम्ही आमच्या नेत्यांना बोललेलं खपवून घेणार नाही असा इशारा दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी, जेष्ठ नगरसेवक अशोक गावडे, नगरसेवक विनोद म्हात्रे, नगरसेवक निवृत्ती जगताप, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेवक देविदास हांडे-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष गणेश भगत, नगरसेवक अशोक गुरखे, नगरसेवक शशिकांत राऊत, माजी नगरसेवक पुरुषोत्तम भोईर, नगरसेविका रुपाली किस्मत भगत, नगरसेविका तनुजा मढवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष केशव म्हात्रे, नगरसेविका छाया केशव म्हात्रे, नगरसेवक लीलाधर नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील, नगरसेविका संगीत बोर्हाडे, नगरसेवक रमेश डोळे, नगरसेविका लता मढवी, नगरसेवक प्रकाश मोरे, नगरसेविका श्रद्धा गवस, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, नगरसेवक विशाल डोळस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश शेट्टी, नगरसेविका शिल्पा कांबळी, भालचंद्र नलावडे, राजेश मढवी, राहुल शिंदे, राहुल इथापे, श्रीधर मढवी, संजय राजपुरे, गगनदीप सिह कोहली, रॉबिन मढवी, जगदीश पाटील, महादेव पवार, शिरीष वेटा, सुदत्त दिवे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी कार्यकतें आजच्या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.