श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई:- नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष दशरथ भगत यांचा वाढदिवस नुसता साजरा न करता समाजातील गरजू व उपेक्षित वर्गाला आवश्यक असलेला जिव्हाळा, आपुलकी व मायेच्या भावनेतून साजरा करण्यात आला.
आज सकाळी १०.३० काँग्रेस भवन, वाशी येथे रिक्षा चालक-मालक यूनियन, टेक्सी यूनियन, माथाडी कामगार अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी व काँग्रेस पक्ष्याच्या अनेक कार्यकर्त्याच्या सानिध्यात अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
त्यानंतर नेरूळ येथील वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्ध महिलांच्या एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आश्रमातील सिनिअर सिटीझन महिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून उपस्थितांना या समाजातील उपेक्षितांच्या मध्ये जाऊन वाढदिवस साजरा करण्याचे समाधान लाभले. सामना प्रेस वाशी येथील झोपडपट्टीतील प्रत्येक कुटुंबा प्रमाणे एक एक किलो चे मिठाई चे पैकेट देऊन व तिथल्या गरीब मुला-मुली व त्यांचे आई- वडील यांच्या समवेत सोहळा साजरा करण्यात आला. वाशी, सेक्टर-९ ए मधील ‘शरण’ या अपंग रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारांची फळांचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे नंतर महापे येथील मुकबधीर मुला- मुलींच्या शाळेला भेट देऊन तिथल्या जवळपास शंभर विध्यार्थ्यांना फळे वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले. हा कार्यक्रम घणसोली ब्लॉक चे अध्यक्ष बन्सी डोके व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमाने साजरा करण्यात आला.व विभागातील मुला-मुलींना खेळाची व व्यायामाची सवय लागून भविष्यात संस्कारी व होतकरू सिटीझन निर्माण व्हावे ह्या उदार हेतूने वाशी गाव जवळ क्रिकेट पीच व वाशी गावात व्यायाम शाळेचे उदघाटन दशरथ भगत यांच्या वाढदिवसा निमित्य करण्यात आले. त्याच प्रमाणे संध्याकाळी ७.०० वाजता जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सानपाडा येथे जेष्ठ नागरिकांना जेष्ठ नागरिक कार्डाचे वाटप करण्यात आले आणि शेवटी रात्री बुद्धेश्वर मंदिर येथे विभागातील अनेक नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा केला. अशा प्रकारे फक्त केक कापून वाढदिवस साजरा न करता समाजातील अनेक वंचित नागरिक, बंधू-बघिणी, बालगोपाल, विध्यार्थी व सर्व थरातील वर्गांना बरोबर घेऊन वाढदिवस साजरा करण्याचा एक नवीन पायंडा दशरथ भगत यांनी पाडला याचा सर्व थरातील नागरिकांनी कौतुक केले.