श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन प्राथमिक मराठी शाळा सेक्टर-18 नेरुळ यांच्या वतीने बाल दिनानिमित्त बाळ मेळावा 2016 चे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 96 च्या नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे संचालक डॉ.शं.पा. किंजवडेकर, संचालक दिनेश मिसाळ, सौ. राजकुमारी इंदलकर, सौ. मनीषा मुळीक उपस्थित होत्या.
शाळेतील शिक्षकांनी मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करून विजेत्यांना पारितोषिके दिली. तसेच मुलांसाठी खास पाव भाजी, पाणी पुरी, वडा पाव ची व्यवस्था केली होती.नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनीं आपल्या भाषणातुन मुलांनी खेळाबरोबर अभ्यासाला हि महत्व दिले पाहिजे.आपले घर,शाळा,परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. आई वडिलांचा आणि गुरुजनांचा योग्य मान राखा असे विद्यार्थी वर्गास आवाहन केले.