श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १२ मधील रामलीला मैदानावर तीन दिवस क्रिकेट रसिकांना नवी मुंबई प्रिमियर लीगच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार प्रत्यक्ष अनुभवयास मिळणार असून २ ते ४ डिसेंबरदरम्यान हा क्रिकेटचा महासंग्राम चालणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून ८ संघातील १६० खेळाडूंच खेळाची मेजवानी क्र्रिकेट प्रेमींना उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते १ डिसेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होत असून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दीड लाख रूपयांचे आहे. दुसरे पारितोषिक ७५ हजार रूपये, तिसरे पारितोषिक ५० हजार रूपये तर चौथे पारितोषिक ४० हजार रूपये असणार आहे. क्रिकेटच्या महासंग्रामाचे हे दुसरे पर्व असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्र्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी दिली.