मुंबई : महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार अशी शेखी मिरवणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्यांची व्यंगचित्रांच्या माध्यमातून खिल्ली उडवण्यात आली आहे. शिवसेनेच्या पालिकेतील कारभाराला सोमय्यांकडून वारंवार लक्ष केलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर व्यंगचित्रातून किरीट सोमय्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न केल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.भाजपा प्रदेश कार्यालयासमोर तोत-या शब्दांत एक फलक लावण्यात आला आहे. हा फलक कुणी लावला याबाबत माहिती नसल्याचे भाजपा0 प्रदेश कार्यालयातील कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र या व्यंगचित्राच्या प्रकरणावरून मुंबईमध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या संघर्ष उद्भवणार आहे. दरम्यान या संदर्भात भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.