अनंतकुमार गवई
* नवी मुंबईकरांसाठीही खुषखबर
* पहाटे ४ वाजता दादरहून कोपरखैराणेची बस सुटणार
मुंबई : प्रवाशांच्या मागणीनुसार दादर रेल्वे स्थानक पूर्वेपासून मुंबई उपनगराच्या विविध भागांमध्ये रात्री उशिरा बस सोडण्याचा निर्णय बेस्ट समितीने घेतला आहे. बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
दादर येथून उशिरा बस सोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती त्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बस मार्ग क्र. २०२ (मर्यादित) ही गुरूवारी रात्रौ १. ४५ वाजता सोडण्यात आली. सदर बसमार्ग दादर रेल्वे स्थानक पूर्व ते गोराई आगार असा कार्यान्वित होणार आहे. याशिवाय बस मार्ग क्र. ४ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते ओशिवरा आगार- रात्रौ २. २५ रात्रौ २. २५ वाजता , बस मार्ग क्र. ३०२ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते मुलूंड स्थानक पश्चिम- रात्रौ २. ३० वाजता, बस मार्ग क्र. ५२१ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते कोपरखैराणे- पहाटे ४. ०० वाजता याप्रमाणे हे अन्य बसमार्ग प्रवर्तित करण्यात येतील.