सबका साथ सबका विकास हेच भाजप आरपीआय युतीचे धोरण
विद्या गायकवाड यांच्या प्रभाग क्रमांक ७ च्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
नवी मुंबई / अनंतकुमार गवई
सबका साथ सबका विकास हेच भाजप आरपीआय युतीचे धोरण असून शेकाप,काँग्रेस,राष्ट्रवादी,समा जवादी व अन्य कितीही विरोधक एकवटले तरी भाजप आरपीआय युती सर्वाना पुरून उरेल असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कळंबोली येथे व्यक्त केला. विद्या मंगल गायकवाड यांच्या प्रभाग क्रमांक ७ येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. शेकाप काँग्रेस सारखी भांडणे भाजप आरपीआय युतीत नाहीत असेही ते यावेळी म्हणाले .
मंगळवारी (दिनांक ११ एप्रिल) रोजी हनुमान जयंती तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्त साधून कळंबोली सेक्टर ११ येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विद्या गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले.यावेळी एका भव्य जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले होत. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कविता गायकवाड,कळंबोलीचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील,बुधाजी ठाकूर,युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील,प्रियांका पवार, यशवंत ठाकूर,अशोक मोटे,राज सदावर्ते,गोपीनाथ भगत,अमोल इंगोले,अमर ठाकूर,रश्मीत कौर,राजू बनकर,शंकरशेठ वीरकर,गोपीशेठ भगत यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले कि, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी करून कळंबोली वासियांनी पनवेल महापालिकेमध्ये भाजप आरपीआय युतीचे हक्काचे उमेदवार पाठविण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे.महापालिकेच्या सातबाऱ्यावर भाजप आरपीआय युतीचेच नाव असेल आणि विद्या गायकवाड यांच्यामुळे विरोधकांच्या लबाड उमेदवारांना पळता भुई थोडी होणार आहे.सबका साथ सबका विकास हे जरी युतीचे धोरण असले तरी एखादा आडवा आला तर जशास तसे उत्तर द्यायलाही आम्ही तयार आहोत असेही ते यावेळी म्हणले. हे कार्यालय केवळ निवडणुकीसाठी उघडले नसून कायमस्वरूपी कळंबोलीवासियांसाठी हे कार्यालय उघडे असेल असेही ते यावेळी म्हणाले.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांचे यावेळचे भाषण त्यांच्या नेहमीच्या ओघवत्या आक्रमक आणि विनोदी शैलीत न्हवते. त्यांच्या भाषणात ,”आम्हाला आई वडील नाहीत तसेच मला विद्याताईंमुळे माझा राजकीय वारसदार मिळाला’ ! हि वाक्ये बोलताना जगदीशभाईंना गहिवरून आले.लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विचार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभ्यासू नेतृत्व यामुळे भाजप आरपीआय युती पनवेल महापालिकेच्या सत्तेत बसणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात ८५० ग्रामपंचायतींची कामे केल्याचे पुरावे आज त्यांचे तेथील बोर्ड पाहिल्यावर कळते. पक्षीय अभिनिवेश न बघता जनहिताची विधायक कामे सिडकोच्या मागे लागून आ. प्रशांत ठाकूर यांनी केली आहेत. शेकापकडे कामे करण्याची धमक नसून शेकापच्या टक्केवारीच्या राजकारणाला कविता गायकवाड यांनी प्रथम विरोध केला आहे असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी विद्या गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानत अशीच साथ देण्याचे आवाहन केले.
चौकट
नवी जुनी सिडको वसाहत आणि ग्रामीण भागाचा प्रभाग ७ येथे बहुजन समाजाचा हा ललकार पहायला मिळत आहे. सिडकोच्या भिंतीवर डोके आपटून प्रश्न प्रलंबित राहिले म्हणूनच आम्ही भाजप युती सरकारकडे महापालिकेची मागणी मान्य करून घेतली.टोलमुक्तीचा शब्द भाजप सरकारने पाळला तसेच महापालिकेच्या स्थापनेची मागणीही पूर्ण केली आहे.
आता नागरिकांची जबाबदारी आहे तेथे भाजप आरपीआय युतीचे हक्काचे उमेदवार निवडून दयायचे आहेत.प्रत्येक सेक्टरला मैदान आणि उद्याने,बाजारपेठ,रस्ते,वीज,पा णी यासारखी कामे महापालिकेमध्ये आपले नगरसेवक करतील. नागरिकही नगरसेवकांना जबाबदार धरतील. म्हणूनच सिडकोपासून आपली मुक्ती झाली आहे. त्यामुळे महापालिकेत हक्काचे उमेदवार पाठवण्यासाठी भाजप आरपीआय युतीच्या मागे ठामपणे उभे राहा. टोलमुक्तीचा शब्द भाजप सरकारने पाळला तसेच महापालिकेच्या स्थापनेची मागणीही पूर्ण केली आहे.
— आ. प्रशांत ठाकूर
जिल्हाध्यक्ष भाजप