साईनाथ भोईर
नवी मुंबई : महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवसाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी महासंघ आणि सुबोध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा हॉस्पिटल यांच्या विशेष सहकार्याने माजी विद्यार्थी महासंघाचे माजी अध्यक्ष कै. सुबोध मुकुंद गडेकर यांच्या स्मरणार्थ विवेकानंद संकुल शाळा,सेक्टर 4, सानपाडा येथे सोमवारी रक्तदान (BLOOD DONATION) आणि रक्त पट्टीका दान (PLATELETS DONATION) शिबिर भरवून माजी विद्यार्थ्यांकडून कै.सुबोध गडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या शिबिराचे उदघाटन कै. सुबोध गडेकर यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले.यावेळी सुबोधचे वडील मुकुंद गडेकर,आई संगीता गडेकर,मोठा भाऊ प्राणिल गडेकर,वाहिनी प्रांजल गडेकर,मावशी संध्या पाटील व नातेवाईक उपस्थित होते. यंदाचे हे शिबिराचे चौथे वर्ष होते.या शिबिरात शाळेतील माजी विद्यार्थी,युवक व युवती, शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी यांचा विशेष सहभाग पहावयास मिळाला. त्याचप्रमाणे जवळ जवळ 500 नागरिकांनी या शिबिरात उपस्थिती दर्शविली.यामध्ये 75 जणांनी रक्तदान आणि 30 जणांनी रक्त पट्टीका दान केले. दरम्यान, मागील 26 फेब्रुवारी रोजी कै. सुबोध गडेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.शाळेत रक्तदान आणि रक्त पट्टीका दान शिबीर राबविण्याची संकल्पना सर्व प्रथम कै. सुबोध गडेकर यांनी राबविली होती.या शिबिरासाठी कै.सुबोध गडेकर यांचा विशेष पुढाकार असायचा.त्यामुळे कै.सुबोध गडेकर यांनी सुरु केलेले कार्य असेच पुढे अविरत चालू ठेवून या शिबिराच्या माध्यमातून कै. सुबोध गडेकर यांना अनोखी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असल्याचे माजी विद्यार्थी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. याप्रसंगी सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी, शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख अॅड. मनोहर गायखे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे,शिव सहकार सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंत्रे,ठाणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत,शिवसेना महिला आघाडी नवी मुंबई जिल्हा संघटक रंजना शिंत्रे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सानपाडा प्रभाग क्रमांक 74 वॉर्ड अध्यक्ष राजेश ठाकूर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सानपाडा-जुईनगर तालुका उपाध्यक्ष भरत ठाकूर,नगरसेविका ऋचा पाटील,भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख महेश बनकर, शिवसेना उपविभाग प्रमुख रामचंद्र पाटील,महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या नवी मुंबई उपशहर प्रमुख सुरेखा गव्हाणे,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा सचिव गणेश पालवे,जिल्हा सचिव मोहित बिलापट्टे,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष श्रीकांत माने,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई शहर सचिव निखिल गावडे, युवा सेना शाखा अधिकारी सचिन कवडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.