संयुक्त महाराष्ट्राचा लढा अभ्यासक्रमात समाविष्ट करा…गजानन काळे
साईनाथ भोईर
नवी मुंबई : १ मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई कला प्रतिष्ठान व जनविकास प्रबोधिनीच्या माध्यमातून पत्रकार कवींच्या झालेल्या “न्युजलेस कविता” या आगळ्या वेगळ्या काव्य मैफिलीला नवी मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिला. वाशी, दैवज्ञ भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नवी मुंबईकर काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र-१ च्या अँकार रचना विचारे, प्रिन्सिपल कॉरेसपॉन्डेंत पंकज दळवी, म.टा. ऑनलाइन चे पत्रकार भीमराव गवळी, दै.सामनाचे पत्रकार माधव गोळे, माय मराठी न्यूज चॅनेलचे संपादक सुरेश ठमके या पत्रकार कवींनी या काव्य मैफिलीत आपल्या कविता सादर केल्या.
समाजातील वास्तव, भयान अवस्था, नैराश्य, अथवा कोणत्याही प्रश्नाची धग सर्वप्रथम कवीला कळते व कवी ते शब्दातून व्यक्त करतो असे म्हणत पत्रकारीते सारख्या आव्हानात्मक क्षेत्रात कार्यरत असूनही कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या पत्रकार कवींचे नवी मुंबई कला प्रतिष्ठान व जनविकास प्रबोधिनी अध्यक्ष गजानन काळे यांनी याप्रसंगी कौतुक केले. तसेच हा महाराष्ट्र हुतात्म्यांचा बलिदान मिळवलेला असून मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची जाणीव नव्या पिढीला व्हावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा असेही आपल्या प्रास्ताविक भाषणात गजानन काळे यांनी सांगितले. या काव्य मैफिलीचे उद्घाटन मनसेचे राज्य सचिव प्रमोद पाटील यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून झाडे जगवा, झाडे लावा हा संदेश देऊन करण्यात आले. संपूर्ण सभागृहात सुलेखनकार ऊर्मी सावंत यांनी कॅलीग्राफी केलेल्या पत्रकार कवींच्या कविता लावण्यात आल्या होत्या.
प्रेम कवितांपासून ते सामाजिक, राजकीय, शेतकरी, कामगार, कष्टकरी, नातेसंबंध अशा विविध विषयांवर उपस्थित पत्रकार कवींनी कधी रसिकांना हसवत तर कधी धीरगंभीर करत आपल्या कविता सादर केल्या. पत्रकार कवींच्या या काव्य मैफिलीचा आनंद नवी मुंबईकरांना पुन्हा घेता यावा यासाठी लवकरच मराठी साहित्य संघात या “न्युजलेस कवितेच्या“ मैफिलीचे आयोजन करू अशी घोषणा मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी याप्रसंगी केली.
या काव्य मैफिलीला मनसे राज्य सचिव प्रमोद पाटील, डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाचे डॉ.श्याम मोरे, पत्रकार मनोज जालनावाला, विकास महाडिक, मिलिंद तांबे, निलेश पाटील, दिनेश पाटील, अनिलकुमार उबाळे, मनोज भिंगार्डे, शैलेश तवटे, विक्रम गायकवाड, सिद्धेश प्रधान, संतोष जाधव, शेखर हमप्रास, मच्छिंद्र पाटील, अजय परचुरे, विनायक पाटील, नरेंद्र बंडबे, प्रवीण पुरो, संजय गुरव, माथाडी हॉस्पिटलच्या डॉ.राजश्री पाटील, रोटरी क्लबचे दिलीप चौधरी, साहित्य संघाचे सुभाष कुलकर्णी, दिग्दर्शक रवी वाडकर, लघुपट दिग्दर्शक सहदेव घोलप, प्रहार संघटनेचे एड.अजय तापकीर, एड.मनोज टेकाडे, संतोष गवस, संघर्ष दारूमुक्ती संघटनेचे संजय जाधव, खारघर मनसे अध्यक्ष जयवंत सकपाळ, अॅड.अक्षय काशीद, तसेच नवी मुंबई मनसेचे निलेश बाणखेले, संदीप गलुगडे, विनोद पार्टे, डॉ.आरती धुमाळ, प्रिया गोळे, सविनय म्हात्रे तसेच मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन मनसेचे श्रीकांत माने यांनी केले तर आभार प्रदर्शन नवी मुंबई कला प्रतिष्ठानचे सचिव उन्मेष चौधरी यांनी केले.