साईनाथ भोईर
नवी मुंबई : प्रभाग सुरक्षित राहावा यासाठी पालिका प्रशासनाकडून पाठपुरावा करून रस्त्यावर, चौकात प्रभाग 87च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी प्रभागात सीसीटीव्ही मंजूर करून घेतले. परंतु बाहेरील सुरक्षेसोबत सोसायटी आवारातील सुरक्षा व्यवस्थाही महत्वाची असल्याने नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने सीसीटीव्ही बसविण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून गत सभागृहात प्रभागातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे शक्य न झाल्याने प्रभागातील सिडको सोसायट्यांमध्ये विकासामध्ये कोठेही दुजाभाव दिसू नये म्हणून तत्कालीन नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी प्रभागातील पाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने पेव्हर ब्लॉक बसवून दिले होते. नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी प्रभागातील सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे.
महापालिका प्रशासन बाहेरील भागातील सुरक्षा ध्यानात घेत असेल तर परिसरातील जनतेची सर्वच सुरक्षा आवश्यक असल्याचा निर्णय घेवून नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी गेल्या महिन्यापासून प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अंर्तगत भागात सीसीटीव्ही बसविण्यास सुरूवात केली आहे. सोमवार 1 मे रोजी नंदनवन या सोसायटीमध्ये आणि मंगळवार 2 मे रोजी सनशाईन सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या कार्यक्रमास सुरूवात केली आहे. तत्पूर्वी संजीवनी, ग्रीन फिल्ड, शिवतीर्थ, प्रभात, सप्तर्षी या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा कार्यक्रम नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी पूर्ण केला आहे.
राजकारणापासून अलिप्त राहून पदरमोड करणारे मांडवे दांपत्य नेरूळ नोडमध्ये जनसामान्यांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. नगरसेविका मांडवे यांनी पदरमोड करून प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यास सुरूवात केल्यामुळे अन्य नगरसेवकांची मात्र झोप उडाल्याचे पहावयास मिळत आहे.