साईनाथ भोईर
नवी मुंबई : नवी मुंबईतील आरोग्यसेवा जनतेच्या विश्वासास अधिक पात्र ठरविण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने लवकरच संबंधीत सर्व घटकांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते गणेश नाईक यांनी बुधवारी दिली.
लोकनेते नाईक यांनी वाशीतील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचा सकाळी पाहणीदौरा केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सल्लागार म्हणून पालिकेच्या रुग्णालयांमधून जनतेला चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा दिली जाते आहे की नाही तसेच रुग्णालयातील रुग्ण, कर्मचारी आणि डॉक्टर इत्यादी घटकांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी या पाहणीदौर्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम संदर्भ रुग्णालयातील रुग्णकक्ष, खानपान कक्ष, औषध भांडार आदींना त्यांनी भेटी दिल्या. रुग्ण, कर्मचारी आणि डॉक्टरांबरोबर चर्चा केली. औषध भांडारातील पाहणीप्रसंगी लोकनेते नाईक यांच्या लक्षात आले की, २०१४साली काही औषधांच्या निविदा निघाल्या होत्या. पालिका प्रशासनाने त्यावेळी औषधे खरेदी केली नाही. त्यानंतर औषधांच्या किंमती वाढल्या. त्यामुळे ही खरेदी प्रक्रीया खोळंबली. जुन्या दराने औषध पुरवठा करण्यास निविदाकार तयार नाहीत. अशा प्रकारच्या इतर काही समस्या सोडविण्यासाठी तसेच ज्या उददीष्टांसाठी आरोग्यसेवा सुरु करण्यात आली आहे त्याची पुर्तता होते आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी लवकरच महापौरांच्या अध्यक्षतेखाली संबंधीत सर्व घटकांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापती सलुजा सुतार यांना लोकनेते नाईक यांनी सुचना केली की, आरोग्य समितीमधील सदस्यांवर शहरातील प्रत्येक पालिका रुग्णालयात नागरिक आणि रुग्णालय प्रशासनामध्ये सुसंवाद साधण्याची जबाबदारी द्या. सुसंवाद साधून रुग्णालयातील अडचणी सोडवा. रोस्टर पध्दतीने रुग्णालय भरती संदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे महापौर पाठपुरावा करतील तसेच यामधील व्यावहारिक अडचणी विषयी बैठकीत उहापोह करण्यात येईल, असे लोकनेते नाईक म्हणाले. आरोग्य सेवेनंतर शिक्षण, पाणीपुरवठा सेवा याविषयी सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याविषयी पत्रकारांनी विचारले असता सिडकोचे तत्कालिन व्यवस्थापकीय-संचालक संजय भाटीया यांच्या कार्यकाळात विष्णूदास भावे नाटयगृहात एका विशेष जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबारात विकास प्रकल्पांविषयक एक सादरीकरण देखील करण्यात आले होेते. या कार्यक्रमात सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याची सर्वप्रथम मागणी केली होती असे सांगून आता काहीजण त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाल्याचा टोला लोकनेते नाईक यांनी या प्रकरणी श्रेय उपटण्याचा केविलवाना प्रयत्न करणार्यांना लगावला. अद्याप सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड झाल्या नसून बरीच कार्यवाही बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
२०१५पर्यतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाने घेतला आहे. मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर टिकला पाहिजे असे नमूद करुन सर्व घटकांची बांधकामे नियमित करा, आम्ही तुमचा सत्कार करु, असे आव्हान लोकनेते नाईक यांनी विरोधकांना दिले.
प्रथम संदर्भ रुग्णालयातील पाहणीदौर्याप्रसंगी लोकनेते नाईक यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, पालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, पालिकेच्या आरोग्य समितीसभापती सलुजा सुतार, पक्षप्रतोद डॉ.जयाजी नाथ, सांस्कृतिक समिती सभापती लिलाधर नाईक, एच प्रभाग समिती अध्यक्षा दिपा गवते, परिवहन समिती सभापती श्याम महाडिक, प्रदेश राष्ट्रवादी डॉक्टरसेलचे डॉ. शिवदास भोसले, नगरसेवक घनश्याम मढवी, नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेविका उषा भोईर, नगरसेवक रमेश डोळे, नगरसेविका मोनिका पाटील, नगरसेवक देवीदास हांडे-पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका रुपाली भगत, नगरसेवक शशिकांत राउत, नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेवक सुरेश शेटटी, माजी नगरसेविका स्नेहा पालकर, तालुकाअध्यक्ष गणेश भगत, नगरसेवक निवृत्ती जगताप, ज्येष्ठ नगरसेवक अशोक गावडे, राजेश भोर, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रमुख ऍड. जब्बार खान, नगरसेविका लता मढवी, नगरसेविका संगीता म्हात्रे, नगरसेवक विनोद म्हात्रे, नगरसेवक गणेश म्हात्रे, माजी उपमहापौर भरत नखाते, समाजसेवक पुुरुषोत्तम भोईर, माजी नगरसेवक रविकांत पाटील, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, राकॉंचे उपाध्यक्ष परशुराम ठाकुर, ऐरोली विधानसभा युवकअध्यक्ष राजेश मढवी, माजी युवकअध्यक्ष जयेश कोंडे, विठठल बांगर, सुदत्त दिवे, वॉर्ड अध्यक्ष राजेश ठाकुर, माजी परिवहन समिती सभापती शशी दामोदरन, प्रदीप गवस, आदी मान्यवर उपस्थित होते.