अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत बांधकाम विरोधात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गुरूवारी मुख्यालयात झालेल्या सर्व विभाग अधिकारीच्या बैठकीत सर्व विभाग क्षेत्रात फेरीवाला, पदपथावरील तसेच अनधिकृत बांधकामावर, होर्डिंग बॅनर्सवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे निर्देश दिले असून व या बाबत कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे व धडक मोहिमा राबविल्या जावे असे आदेश दिले आहे.
या अनुषंगाने गुरूवारी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व अंबरीश पटनिगेरे उपायुक्त अतिक्रमण यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे कोपरखैरणे व वाशी विभाग क्षेत्रात दुकाना बाहेरील समाशी जागेवर, पदपथावर अनधिकृत व्यवसाय करणारे फेरीवाले, आठवडी बाजारावर जोरदार कारवाई करण्यात आली. या मोहिमेच्या वेळी तुर्भे येथील सानपाडामधील 50 फेरीवाले विक्रेते, वाशीमधील 60 फेरीवाला, कोपरखैरणेमधील 150 च्या आसपास अनधिकृत फेरी व्यवसाय करण्यार्यावर कारवाई करून संख्येने अनधिकृत 3 टपर्या , 7 हातगाड्या, मोठ्या प्रमाणात विक्री समान जप्त करून डम्पिंग ग्राउंडवर जमा करण्यात आले. आयुक्तांच्या सक्त आदेशामुळे, सर्व विभाग कार्यालयांनी आता येत्या आठवड्यात दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत वर कारवाया करण्याचे मोहीम हाती घेतली जाणार आहेत. गुरूवारच्या मोहिमेत वाशी विभाग कार्यालयाचे महेंद्रसिंग ठोके, कोपरखैरणे विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी अशोक मढवी, तुर्भे विभाग कार्यालयाचे अंगाई साळुंखे यांनी संयुक्त मोहीम घेऊन अतिक्रमण पथकांच्या माध्यमातून फेरीवाल्यांवर विशेष कारवाई करण्यात आली असून फेरीवाल्यांवर यापुढेही सतत या स्वरूपात कारवाई सुरूच राहणार आहे.