नवी मुंबई / सुजित शिंदे
नवी मुंबईतील बोनकोडे गाव येथील विठ्ठल रखुमाई पालखी सोहळ्यात रममाण झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोली मतदारसंघाचे युवा आमदार संदीप नाईक. विज्ञानाची कास धरलेले परंतु आध्यात्माची गोडी नसानसात भिनलेले सांप्रदायिक वृत्तीचे संदीप नाईक परिसरातील विकासकामांमध्ये लक्ष देताना अखंड हरिनाम सप्ताह, भजन, किर्तनामध्ये तितकेच रममाण व तल्लीम झालेले नेहमीच पहावयास मिळतात.