आगरी कोळी युथ फाउंडेशच्या पदाधिकाऱ्यांची गावाला भेट
नवी मुंबई / साईनाथ भोईर
२१ व्या शतकातील सैटेलाइट शहर म्हणून नवी मुंबई शाहरकडे पाहिले जाते .आणि सिडको निर्मित या शहरात खारघर सारखा अद्ययावत सुख सोयिनी नटलेला खारघर शहर आहे.आणि याच परिसरात धामोळे या गावाचा समावेश आहे. पन हे गावा आज त्यांच्या मूलभूत सुविधा आणि हक्क मिळण्यापासून कोसो दूर आहे. आणि त्याना त्यांच्या मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आणि येथील परिस्थिचा आढावा घेण्यासाठी आगरी कोळी युथ फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनि धामोळे गावचा पाहणी दौरा केला.
२१ व्या शतकातील सैटेलाइट शहर म्हणून नवी मुंबई- मधील खारघर हे सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाते. खारघर जवळच सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या शहराचे नाव जगाच्या नकाशावर उंचावले आहे.मात्र येथील गोल्फ कोर्स परीसरा जवळ धामोळे हे आदिवासी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.या गावाजवळ अंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स आहे. या गावाचा प्रमुख रस्ता गोल्फ कोर्सने अतिक्रमित करून या गावाची पिढ्यानपिढ्याची वहिवाट अडवण्याचा प्रयत्न गावात शिरतानाच प्रशासनाने केला आहे. गावात पोहचल्यावर आपण मराठवाड्यातल्या गाबत आलो की काय असा भास होतो.इतकी दयनीय अवस्था येथे दिसून येते. येथे पाण्याची वाणवा आहे.कित्येक किटीकेमिटर लांब जाऊन येथील गावकऱ्यांना पाणी आणावेलागत आहे.मात्र याच गावाला लागून असलेल्या गोल्फ कोर्सच्या हिरवळीवर पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत. गावातील विहिरी संपूर्णपणे कोरड्या ठाक पडलेल्या आहेत. सिडकोच्या माध्यमातून या गावात पाण्याची पाईपलाईन आलेली आहे.मात्र त्या पाईपमधून पाणीच येत नाही आणि जर आले तर ते पिण्यापूरतेही मिळत नाही. इतकी भीषण अवस्था २१ व्या शतकातील शहरात असलेल्या या गावाची झालेली पाहायला मिळत आहे.या गावाची लोकसंख्या ४०० ते ५०० च्या दरम्यान आहे.तर या गावात ३ री पर्यंत शाळा असुन ती नासल्यासारखीच असल्याचे या शाळेकडे बघितल्यावर जाणवत आहे.तर आरोग्यच्या दृष्टीने येथे प्रशासनाचे संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.या गावातील आदिवासी नागरिकांनी आतापर्यत प्रशासनात आणि राजकीय नेत्यांकडे अनेकवेळा दाद मागितली आहे.मात्र अश्वासनांखेरीज त्यांना काहीही मिळालेले नाही.मात्र आता आगरी कोळी युथ फाउंडेशनने या गावाला भेट देऊन येथील आदिवासी बांधवांना त्यांचा मूलभूत हक्क आणि सुविधा मिओवून द्यायचा विडा उचलला आहे.फाउंडेशनचे डॉ.निलेश भदाणे, खारघर येथील संघर्ष फाउंडेशनचे रमेश मेनन यांनी तातडीने याबाबतीत गावकऱ्यांशी सभा घेऊन युथ फाउंडेशनच्या टीमबरोबर गावातले ८ ते १० तरुण सोबत काम करण्यासाठी तयार केले आहेत.
प्रशासकीय आणि राजकीय दोन्ही पातळींवर पाठपुरवा करून विषय मार्गी लावण्यासाठी एका बाजूला प्रयत्न करण्यात येणार आहे.तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीमध्ये या गावाला किमान टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आगरी कोळी युथ फाउंडेशन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.