सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : वृक्षसंवर्धन व जागतिक पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शिवसेनेच्या नेरूळ पश्चिमेकडील प्रभाग 87च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी 1 जुन रोजी नेरूळ सेक्टर 8 परिसरातील राजर्षी शाहू महाराज उद्यानात व कै. भाऊसाहेब शेरे उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका मांडवे यांच्यासमवेत माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, शिवसेना शाखाप्रमुख राजेश पुजारी, गणेश कुलकर्णी, युवा सेनेचे उपयुवा बेलापुर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे, युवा सेनेचे उपविभाग अधिकारी विशाल गुंजाळ, उपशाखाधिकारी अजय गरड, शरद पांजारी, शलाका पांजारी, शुभांगी परब, जयश्री बेळे, उर्वशी, प्रकाश वाघमारे, सुरेश मोरे, गौतम शिवाळे, आप्पा करंदीकर, राकेश वाघमारे, वार्डे, माने, दळवी, पाटील, घार्गे, दादू म्हसाडे, बंटी शिर्के, इमरान, राजेश बोरले आणि विभागिय जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.