मातोश्री हौसाआई आठवलेंचा आंबेडकरी जनतेतर्फे झाला कृतज्ञतापूर्वक सत्कार
मुंबई – आई म्हणजे त्यागाचे आणि मायेचे महाकाव्य आहे . आईने केलेल्या कष्टामुळे त्यागामुळेच आपण घडलो . महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन जीवन घडविण्याचे संस्कार आईनेच माझ्यावर केले . तिच्यामुळेच मी कार्यकर्ता होऊ शकलो ; केंद्रीयमंत्री होऊ शकलो . मी कितीही मोठा झालो तरी आई समोर छोटाच आहे अशी कृतज्ञ भावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या .
संघर्षनायक केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंसारखा कर्तबगार लोकनेता घडविल्याबद्दल त्यांच्या मातोश्री हौसाआई आठवले यांचा रिपाइंतर्फे कृतज्ञतापूर्वक भव्य सत्कार आज प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात करण्यात आला त्यावेळी राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन विकास मंत्री ना. महादेव जानकर सौ सीमाताई आठवले अविनाश महातेकर गौतम सोनवणे सुरेश बरशिंग
आशाताई लांडगे फुलाबाई सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन रिपाइं रोजगार आघाडीचे अध्यक्ष चंदू जगताप गीता कपूर रतन अस्वारे अमित तांबे आदींनी केले .
आपण जसे आईच्या आशीर्वादाने मंत्री झालो तसेच महादेव जानकर सुद्धा आईच्या आशीर्वादानेच मंत्री झालो आहोत. समाजातील सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते म्हणून पँथर पासून रिपाइं पर्यंत आपले नेतृत्व मंत्रीपदापर्यंत पोहोचले असे सांगत माझ्या आईचा सत्कार म्हणजे आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आईचा सत्कार आहे . असे ना . रामदास आठवले म्हणाले .
मंत्री महादेव जानकर आणि लोककवी प्रा प्रशांत मोरे व रिपाइं च्या विविध मान्यवरांच्या हस्ते ना . रामदास आठवलेंच्या मतोश्रींचा सत्कार यावेळी करण्यात आला . यावेळी ना . रामदास आठवलेंच्या हस्ते आई एक महाकाव्य या प्रा प्रशांत मोरे यांच्या कवितांच्या व्हीसीडी चे प्रकाशन करण्यात आले . यावेळी ना . रामदास आठवले हे माणगंगा नदीकिनारी पट्ट्याततील माणदेश या दुष्काळी भागात खडतर बालपण काढल्याची आणि त्याही आवास्थेत शिक्षण घेत पुढे दलित पँथर ची चळवळ चालविली . त्यावेळी सांगली सातारा या भागात भारतीय दलित पँथर च्या सभा असल्यास आठवलेंच्या मातोश्री आमच्या साठी जेवण आणून देत असत अशी वात्सल्याची माऊली हौसा आई असल्याची आठवण रिपाइंचे राष्ट्रीय सचिव सुरेश बरशिंग यांनी यावेळी सांगितली . यावेळी संजय भिडे दयाळ बहादूरे अभयाताई सोनवणे शशिकला वाघमारे नीता अडसुळे चंदू कांबळे गौरी तिरमारे हेमंत रणपिसे संजय खंडागळे चंद्रशेखर कांबळे ईश्वर धुळे प्रल्हाद जाधव उमाकांत रणधीर कमलेश यादव सिद्धार्थ कासारे बाळासाहेब गरुड सोना कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते .a