नवी मुंबई : राज्य सरकारच्या वने विभागाने पावसाळा कालावधीत जुलैच्या पहिल्या सप्ताहात पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम निर्धारित केला आहे. याच उपक्रमास हातभार लावण्यासाठी नेरूळ परिसरात भाजयुमोच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हा सचिव प्रदिप बुरकूल व नवी मुंबई जिल्हा युवती उपाध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिरवणे विद्यालय मैदान, से.2, छत्रपती संभाजी महाराज उद्यान,से.2 तसेच सुभाषचंद्र बोस उद्यान से.4 या ठिकाणी भाजयुमोकडून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हा महामंत्री गुलाब नाविक, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विकास सिंह, युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश पालवे, युवा मोर्चा सचिव राजेश चोरट, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री उज्वला जगताप, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा होसमानी, जिल्हा अध्यक्ष वि.जे.एन.टी. भास्कर यमगर, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष अमोल माने, मंडळ युवती प्रमुख पूनम साळुंखे, युवा मोर्चा मंडळ महामंत्री केशव बने, सचिव वीरेंद्र म्हात्रे, रुबी नायर, संगम मिश्रा, अभिषेक उपाध्याय, अक्षय पाचारणे व भाजपा चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.