नवी मुंबई : शिवसेना आणि भाजपाचे आमदार शेतकर्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत.सत्ताधारी मंत्री, आमदार हे बेताल वक्तव्य करुन शेतकर्यांच्या भावना दुखावित आहेत.तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील रोजच्या वादाने राज्यातील जनतेची करमणुक होत आहे.ठोस निर्णय घेण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही.त्यामुळे सेना-भाजपामधील अस्थिरतेने राज्याचा विकास खुंटला असून अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे, अशी टिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विधी मंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केली.नवी मुंबईचा सर्वांगिण विकास हा लोकनेते गणेश नाईक यांच्यामुळे झाला असून नवी मुंबई महापालिकेतील यशानंतर राज्यातील सत्तापरिर्वनाची महूर्तमेढ ही नवी मुंबईतूनच सुरु होईल, असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला.
वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मार्गदर्शन महामेळावा आज (ता.९) रविवारी आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला अभिवादन करुन आणि सेवालादलाच्या संचलनाने मेळाव्याला शिस्तबध्दपणे सुरुवात झाली.
या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, लोकनेते गणेश नाईक, महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिताताई पाटील
जिल्हा निरीक्षक मुनाफ हकीम, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयदीप गायकवाड, सिडकोचे माजी संचालक प्रमोद हिंदूराव, जेष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, सभागृह नेते जयवंत सूतार, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनंत सूतार, महिला अध्यक्षा माधुरी सूतार, युवकचे जिल्हाध्यक्ष सूरज पाटील, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश पारख, अल्पसंख्याक सेलचे जब्बार खान, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.त्याच बरोबर राष्ट्रवादी महिला, युवक, विद्यार्थी, अल्पसंख्याक सेल, सेवादल आणि एपीएमसीचे संचालक मंडळ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना संबोधीत करताना अजितदादा पवार यांनी केंद्रात व राज्यात सत्तेवर असणार्या भाजपा सरकारने कुणाला अच्छे दिन आलेत? असा प्रश्न उपस्थित केला.हे सरकार वेळ मारुन नेणारे आणि देशाला उद्योगतीकडे नेणारे सरकार असल्याची टिका पवार यांनी केली.नोटाबंदीमुळे देशाची अर्थ व्यवस्था संकटात आली आहे.सरकारला परदेशातील काळापैसा परत आणण्यात अपयश आले आहे.ठाणे जिल्हयातील धोकादायक इमारतीचा प्रश्न, सिडकोच्या घरांचा प्रश्न, क्लस्टरचा निर्णय आणि राज्यातील शेतकर्यांचा कर्ज माफीचा निर्णय अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस सरकार अपयशी ठरले असून जनतेची दिशाभूल करणार्या या सरकारला घराचा आहेर देण्याची वेळ आली असल्याचे पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन म्हणाले की, गेली ५० वर्ष महाराष्ट्राचे नेतृत्व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केले आहे.राज्यात १५ वर्ष सत्तेवर असताना जनतेला, शेतकर्याला पवार यांनी न्याय दिला आहे.परंतु आता सत्तेवर असलेल्या सेना-भाजपाला बळीराजाला न्याय देता आला नाही ही शोकांतिका असल्याचे तटकरे म्हणाले.शिवसेना ही भाजपा सोबत सत्तेत आल्यानंतर शेतकर्यांना न्याय देऊ शकली नाही.सेनेची असणारी दुतोंडी भुमिका ही जनतेने पाहिली आहे आणि आगामी कालावधीत सेनेलाही जनता आसमान दाखवेल असे तटकरे म्हणाले.राज्यात मोदी लाट असताना सुध्दा लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा झेंडा फडकवून मोदी लाट मोडून काढण्याचा प्रारंभ नवी मुंबईने केल्याचे तटकरे म्हणाले.मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांना मागे टाकत नवी मुंबई शहर हे देशात टॉपटेन शहर गणले गेले आहे.हे केवळ लोकनेते गणेश नाईक यांच्या व्हिजनमुळे झाल्याचे तटकरे म्हणाले.कार्यकर्त्यांनी लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वाटचाल आणखी जोमाने सुरु ठेवा, असे आवाहन तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.
लोकनेते गणेश नाईक यांनी सत्ताधारी सेना-भाजपाच्या कारभारावर टिका केली.भाजपाचे सरकार हे जाहिरात बाजी करुन सत्तेवर आलेले सरकार आहे.त्यामुळे या सरकारला जनतेच्या प्रश्नांची कोणतीही जाण नाही.शेतकरी, कामगार, महिला वर्ग, व्यापारी अशा सर्वच घटकांना न्याय देण्यात सरकारला अपयश आले आहे.त्यामुळे या सरकारला जनता त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असे लोकनेते नाईक म्हणाले.राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांचे विचार त्यांची कार्यपध्दती सर्व सामान्य लोकांपर्यत पोहचवा आणि आतापासून सन-२०१९ चे मिशन डोळया समोर ठेऊन जोमाने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या शिलेदारांना लोकनेते नाईक यांनी केले.
मेळाव्याचे प्रस्ताविका जिल्हा अनंत सूतार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींकडून मार्गदर्शन मिळावे आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.तर महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी राज्यातील महिला असुरक्षित असून सरकार हे धनदांडयांच्या पाठीशी राहणारे असून सर्व सामान्यांना महागाईत खाईत लोटणारे असल्याची टिका केली.महापौर सुधाकर सोनावणे यांनी नवी मुंबई शहराचा विकास हा लोकनेते गणेश नाईक यांच्यामुळे झाला असून कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार आणि मार्गदर्शन घेऊन यापुढेही जोमाने काम करावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी मानले.
मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्याच बरोबर नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी हा मेळावा घेण्यात आल्याचे
या मेळाव्यात लोकनेते गणेश नाईक यांच्या विचाराने प्रेरीत झालेले नवी मुंबईतील युवक कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी योगेश ठोसर यांच्यासह संकेत ठोसर, रतीष थोरात, अरविंद जैन, संतोष यादव, नोमन काजी, विजय पवार, इमारन शेख आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
लोकनेते गणेश नाईक यांच्या व्हिजनमुळे नवी मुंबई महाराष्ट्रात अव्वल
लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहराचे यशस्वी नेतृत्व केले आहे.त्यामुळे देशातील पहिल्या स्मार्ट १० शहरांमध्ये नवी मुंबईने मुंबई, ठाण्याला मागे टाकत स्थान मिळविले आहे.महाराष्ट्राची लौकिकता ही नवी मुंबई वाढविली आहे.आपले शहर हे विकासाचे शहर व्हावे, नागरिकांना अधिकाधिक चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळाव्या, चांगले शिक्षण मिळावे, त्याच बरोबर आरोग्य, रोजगार मिळावे अशा स्वरुपाचे विकासाचे व्हिजन लोकनेते गणेश नाईक यांनी मांडल्याने नवी मुंबईही देशात नावाजली आहे, असे गौरगोद्गार विधी मंडळ नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढले.