सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सेंट्रल टीबी डिव्हिजन, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 8 जिल्हे व 7 महानगरपालिकांतर्गत दि. 17 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही ही मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरी भागातील दूर्गम व झोपडपट्टी कार्यक्षेत्रातील संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असून त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी.बी.डी., नेरुळ-1, तुर्भे, इंदिरानगर, पावणे, नोसील नाका, कातकरीपाडा, चिंचपाडा, इलठणपाडा व दिघा या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या दूर्गम व झोपडपट्टी कार्यक्षेत्राची सर्वेक्षणाकरीता निवड करण्यात आली आहे.
ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 101 समूह तयार करण्यात आले असून त्यांच्याव्दारे मोहीम कालावधीत एकूण 52367 घरांमधील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी या विभागातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना क्षयरुग्ण शोध मोहीम सर्वेक्षणकामी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.